Join us

बिग बॉसच्या घरात येणार राम राज्य? विकासच्या वक्तव्याची होतीये सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 19:51 IST

Bigg boss marathi 3: सुरुवातीच्या काळात एकत्र नांदणाऱ्या या सदस्यांमध्ये आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये आता दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावरुन गॉसिप्स किंवा चर्चा रंगत असते.

ठळक मुद्देविकास पाटील आणि विशाल निकम यांच्यातील संवाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व सुरु होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे हळूहळू या घरात वाद आणि नवनवीन टास्क रंगू लागले आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात एकत्र नांदणाऱ्या या सदस्यांमध्ये आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये आता दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावरुन गॉसिप्स किंवा चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या विकास पाटील आणि विशाल निकम यांच्यातील संवाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'च्या घरात लवकरच राम राज्य येणार आहे', असं म्हणत विकासने घरातील अन्य स्पर्धकावर टीका केली आहे. 

आजच्या भागात विकास (vikas patil) थेट बिग बॉससोबत संवाद साधणार आहे. यावेळी घरात चाललेल्या प्रत्येक गोष्टीची तक्रार तो बिग बॉसकडे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

“आता जरी रावणाचं राज्य चालत असलं तरीदेखील एक ना एक दिवस राम राज्य येईल. बिग बॉस काळजी करु नका,”असं विकास बिग बॉसला (bigg boss) सांगणार आहे. सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार असं देखील विकास म्हणाला.  

दरम्यान,  बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर शांतपणे वावरणारा विकास आता आक्रमकवृत्तीने प्रत्येक टास्क खेळू लागला आहे. त्यामुळे विकासची खिलाडूवृत्ती पाहून हळूहळू तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरु लागल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार