Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा संसार मोडल्यानंतर स्नेहा करत होती 'या' डान्सरला डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 16:53 IST

Sneha wagh: अलिकडेच एका मुलाखतीत स्नेहाने वैवाहिक जीवनात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पतींवर काही आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होती.

ठळक मुद्देस्नेहा तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या एका प्रसिद्ध अभिनेता, डान्सरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. काही दिवसांपूर्वीच या शोचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वात काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरेही पाहायला मिळत आहेत. त्यातच अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरदेखील  यंदाच्या पर्वात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांची चर्चा आहे. यामध्येच सध्या स्नेहाच्या लव्हलाईफविषयीदेखील अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे दोन वेळा संसार मोडल्यानंतर स्नेहा तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या एका प्रसिद्ध अभिनेता, डान्सरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

अलिकडेच एका मुलाखतीत स्नेहाने वैवाहिक जीवनात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पतींवर काही आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होती. विशेष म्हणजे ही चर्चा थांबत नाही. तोच आता स्नेहा एका डान्सरला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

'बिग बॉसच्या घरात जायची गरज नव्हती'; शिवलीलाच्या फॉलोअर्सने व्यक्त केली नाराजी

स्नेहा बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी तिचं नाव डान्सर, अभिनेता फैजल खानसोबत जोडलं जात होतं. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर, फैजलच्या गर्लफ्रेंडने मुस्कान कटारियानेदेखील या दोघांमधील जवळीक वाढल्याचे आरोप केले होते. परंतु, स्नेहा आणि फैजल या दोघांनीही ही अफवा असल्याचं म्हणत या चर्चांवर पडदा टाकला होता. मात्र, स्नेहा बिग बॉसच्या घरात गेल्यावर पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशीपची चर्चा रंगू लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी स्नेहाचं नाव तिच्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या डान्सर आणि अभिनेता फैजल खान याच्यासोबत जोडलं जात होतं. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु दोघांनीही या नात्याला नकार देत या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, वयाच्या १९ व्या वर्षी स्नेहाने अभिनेता अविष्कार दारव्हेकरसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर स्नेहाने २०१५ मध्ये अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं. मात्र, हे लग्न केवळ ८ महिनेच टिकलं. 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठीफैजल खान