Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने पुण्यात घेतलं स्वत:चं घर, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:13 IST

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने शेअर केले ड्रीम होमचे फोटो, म्हणाली...

बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. अनेक रिएलिटी शोमध्ये सहभागी झालेली मिनल शाह ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात दिसली होती. या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी मिनल एक होती. उत्तम खेळी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिनलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांमध्ये मिनलने स्थान मिळवलं होतं. ‘बिग बॉस’मुळे तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली होती. मिनल सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

मिनलने नुकतंच तिचं ड्रीम होम खरेदी केलं आहे. पुण्यात स्वत:चं घर खरेदी करत मिनलने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आपल्या नव्या घराचे काही फोटो मिनलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. “पहिलं यश, स्वागत आहे” असं कॅप्शन मिनलने या स्टोरीला दिलं आहे. मिनलने घर खरेदी केल्यानंतर तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...”

मिनलने अनेक हिंदी रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘एमटीव्ही रोडीज’ या रिएलिटी शोमध्येही मिनल सहभागी झाली होती. ‘रोडीज’मुळे तिला लोकप्रियता मिळाली. मिनल सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो आणि आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती शेअर करताना दिसते.

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार