Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:37 IST

'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत.

Bigg Boss Hindi Season 18 : सध्या मनोरंजन विश्वात 'बिग बॉस मराठी'चा बोलबाला आहे. आता त्यापाठोपाठ  प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'बिग बॉस' हिंदीचा १८ वा सीझन लवकरच भेटीला येतोय. 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळते आहे. दरम्यान, यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या एका स्पर्धाकाविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. 

सलमान खान यंदाच्या 'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन होस्ट करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. येत्या ६ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम हिंदी कलर्स वाहिनीवर सुरू होणार आहे. या १८ व्या पर्वास १८ नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, मनोरंजन विश्वात या पर्वात सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या एका स्पर्धकाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगते आहे. मीडिया रिपोर्टनुसार नागिन फेम अभिनेत्री निया शर्माने या शोसाठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.

'बिग बॉस हिंदी'साठी या अभिनेत्रीने आकारली सर्वाधिक फी-

अलिकडेच रोहित शेट्टी यांनी खतरों के खिलाडी च्या सेटवर निया शर्मा बिग बॉस हिंदीच्या या पर्वात दिसणार असल्याची हिंट दिली होती. 'बिग बॉस ताजा खबर' मार्फत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरात निया संपूर्ण १४ आठवडे राहिल्यास एका एपिसोडसाठी ५.४ लाख रुपये मानधन देण्यात येईल. अशातच निया फिनालेपर्यंत पोहचली तर तिच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असं म्हटंल जातंय. तसंच नियाने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी ५.५ कोटी फी घेणार असल्याची माहिती मिळते आहे.

अलिकडेच 'कुंडली भाग्य 'फेम अभिनेता धीरज कपूरला सर्वाधिक मानधन देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती नाही. 

कोण आहे निया शर्मा?

अभिनेत्री निया शर्माने 'काली- एक अग्निपरिक्षा' या मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्याशिवाय स्टार प्लस वाहिनीवरील 'एक हजारों में मेरी बहना हैं' या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. 'नागिन', 'जमाई राजा' या टीव्ही सिरिअल्समध्येही तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खाननिया शर्माटिव्ही कलाकारसोशल मीडिया