मनोरंजन विश्वातून अनेकांचे सुखी संसार सुरु असतात. पण काहींच्या संसारात मात्र घटस्फोटाचं वादळ येतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसतो. टीव्ही इंडस्ट्रीतील अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या आयुष्यात घटस्फोट होणार का, अशी चर्चा आहे. हे सेलिब्रिटी कपल म्हणजे गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला. गौरव आणि आकांक्षा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र आकांक्षाने एक पोस्ट लिहिल्याने दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे.
नेमकी काय आहे ती पोस्ट? आकांक्षाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, "ज्या नात्याचा पाया केवळ गरजेवर आधारलेला असतो, तिथे मन नेहमीच बलिदान देतं." इतकेच नाही तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने अधिक गंभीर विधान करत लिहिले, "जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही तयार आहोत, तेव्हा आम्ही तयार नव्हतो."
चाहत्यांच्या प्रतिक्रिया आकांक्षाची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विचारलं की, "गौरव आणि तुमच्यात सर्व काही ठीक आहे ना?" तर एका युजरने उपरोधिक टोला लगावत लिहिले, "बरोबर आहे, तिची गरज आणि गौरवचे बलिदान." मात्र, काही चाहत्यांच्या मते ही पोस्ट तिच्या आगामी एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असू शकते.
१० वर्षांचे यशस्वी नाते
गौरव आणि आकांक्षा यांचे लग्न २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये झाले होते. गौरवने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याला आकांक्षाशी पहिल्या नजरेतच प्रेम झाले होते. 'बिग बॉस १९' जिंकल्यानंतरही या दोघांनी सोशल मीडियावर अनेक आनंदाचे क्षण शेअर केले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या अशा पोस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गौरव खन्ना सध्या त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे, तर आकांक्षानेही आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही सुरळीत असावे, अशी चाहत्यांना आशा आहे.
Web Summary : Rumors swirl around actors Gaurav Khanna and Akanksha Chamola after her cryptic Instagram post about relationships built on need. Fans speculate trouble in their 10-year marriage, while some suggest it's a publicity stunt. The couple married in 2016.
Web Summary : गौरव खन्ना और आकांक्षा चमोला के रिश्ते में दरार की अफवाहें, आकांक्षा के एक रहस्यमय इंस्टाग्राम पोस्ट के बाद उठीं। प्रशंसकों ने उनकी 10 साल की शादी में परेशानी की अटकलें लगाईं, जबकि कुछ ने इसे पब्लिसिटी स्टंट बताया। जोड़े ने 2016 में शादी की थी।