Join us

प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:09 IST

कोण आहे हे कपल?

सर्वात चर्चेतला आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा ना सीझन लवकरच येणार आहे. बिग बॉस १९ (Bigg Boss 19) ची सर्वच जण वाट पाहत आहेत. याही सीझनसाठी सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खानच होस्ट आहे. सध्या या सीझनबद्दल सतत काही ना काही अपडेट समोर येत आहेत. जुलै महिन्यात बिग बॉस १९ प्रीमियर होईल अशी चर्चा आहे. तसंच यावेळी युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्सना अजिबात घेतलं जाणार नाही. दरम्यान आता मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कपलला बिग बॉस १९ ची ऑफर देण्यात आली आहे. कोण आहे हे कपल?

'बिग बॉस'मध्ये याआधीही अनेक नवरा-बायको सहभागी झाले आहेत. तर आता नव्या सीझनमध्ये एक टीव्ही कपल सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.'टेलिचक्कर'च्या रिपोर्टनुसार, अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) आणि पत्नी गौतमी कपूर (Gautami Kapoor) यांना 'बिग बॉस १९'साठी विचारणा झाली आहे. जर दोघांनी होकार दिला तर ते नक्कीच या शोचा भाग होतील. राम आणि गौतमीला बिग बॉसमध्ये बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.  मात्र अद्याप दोघांकडूनही याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. 

मध्यंतरी दोघंही चर्चेत होते

काही दिवसांपूर्वी राम कपूर चांगलाच चर्चेत होता. एका मुलाखतीत त्या बडे अच्छे लगते है मालिकेचा किस्सा सांगितला होता. मालिकेत त्याने साक्षी तन्वरसोबत इंटिमेट सीन दिले होते. त्यावेळी साक्षी असहज झाली होती. मात्र एकता त्यावर ठाम होती. एकताने नंतर रामवर पलटवार करत शोबद्दल मुलाखतीत चुकीचं बोलल्यावरुन सुनावलं होतं. तर यावर गौतमी कपूरने मुलाखत देऊन पतीची बाजू घेतली होती. यावरुन दोघंही चर्चेत होते. तसंच राम कपूरने १८ महिन्यात तब्बल ५५ किलो वजन कमी केल्यानेही तो चर्चेत आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉसराम कपूरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार