Join us

Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:05 IST

Tanya Mittal And Bigg Boss 19 : तान्याने असाच एक मोठा खुलासा केला आहे. 

तान्या मित्तल केवळ 'बिग बॉस'च्या घरातच नाही तर घराबाहेरही चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे ती असं काही बोलते की आपसूकच लोकांचं लक्ष तिच्याकडे वळतं. तान्याने असाच एक मोठा खुलासा केला आहे. 

तान्या मित्तलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं इन्स्टाग्राम हॅक झालं होतं. अशा परिस्थितीत तिला तिचं सर्व सोनं विकावं लागले. तिच्या टीमने तिचे अश्रूही पाहिले आहेत. तिला तिच्या वाढदिवसाला मिळालेलं सर्व सोनं एका रात्रीत विकावं लागलं.

५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'

तान्याला तिचा फोनही विकावा लागला. तान्या त्यावेळी तीन आयफोन वापरत होती, तिने ते सर्व विकले होते. तिला वाटलं की, पगाराशिवाय मुलं काम करणार नाहीत. रिकव्हरीसाठी ७-८ महिने लागले. पण त्या काळात तिच्या एकाही कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं नाही.

तान्याने जे काही करता येईल ते केले. त्या काळात ती एका पोस्टमधून एक लाख रुपये कमवत असे. तान्या म्हणते की, जर ती कुठेतरी गेली आणि तिच्यासाठी २१००० ची रुम असेल तर तिच्या ड्रायव्हरसाठी सेम रुम असायची.

 १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण

कर्मचारी तिच्यासोबत जेवतात. तान्याने अनेक मुलाखतींमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिचे पालक तिला कोणाशीही मैत्री करू देत नव्हते. तिचे पालक तिला सांगायचे की फक्त तेच लोक तिचे मित्र आहेत. तिची आई तिला अनेकदा भजन ऐकायला सांगते. टीव्हीवर दुसरे काहीही पाहू नको असंही म्हणते.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारटेलिव्हिजन