'बिग बॉस १९'चा हा सीझन यंदा चांगलाच गाजत आहे. विविध स्पर्धक यावेळी 'बिग बॉस १९'चं घर गाजवत आहेत. अशातच 'बिग बॉस १९'मध्ये सलमान खानच्या उपस्थितीत पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस १९'च्या दुसऱ्या आठवड्यातील वीकेंड का वारमध्ये सलमान खानने याची घोषणा केली. आणि विशेष म्हणजे 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीचं अभिनेत्री शहनाज गिलशी खास कनेक्शन आहे. शहनाज सुद्धा यावेळी उपस्थित असलेली दिसली.
'बिग बॉस १९'च्या घरातील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री कोणाची?
'बिग बॉस'घरात प्रत्येक सीझनमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाईल्ड कार्ड एंट्रीची नेहमीच उत्सुकता असते. यंदाच्या 'बिग बॉस १९' मध्ये आता पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार असून, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात 'बिग बॉस १९'च्या स्टेजवरील दार उघडलं जात असून घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झालेली दिसत आहे. शहबाज 'बिग बॉस १९'मध्ये प्रवेश करणार, याविषयी अधिकृत खुलासा झाला नसला तरीही आजच्या भागात याविषयी कळून येईल.
शहबाजने 'बिग बॉस १३' मध्ये बहीण शहनाजला पाठिंबा देण्यासाठी एंट्री घेतली होती. त्याचवेळी त्याने भविष्यात कधीतरी 'बिग बॉस'मध्ये त्याला जायला आवडेल असंही सांगितलं होतं. शहबाजची बहीण शहनाजने 'बिग बॉस १३' गाजवलं होतं. शहनाजला 'बिग बॉस १३'नंतर खूप प्रसिद्धी मिळाली आणि आज ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन शहबाज 'बिग बॉस १९' गाजवणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. घरातील पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे 'बिग बॉस १९'चं वातावरण कसं बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.