प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच त्याचा १९ वा सीझन घेऊन येत आहे आणि यंदा या शोमध्ये अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. काही तासांपूर्वीच 'बिग बॉस १९'चा पहिला प्रोमो रिलीज झाला. त्यामुळे आता 'बिग बॉस १९' सुरु कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालनची जबाबदारी अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा सांभाळणार का? हाही अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर
'बिग बॉस १९'ची थीम आणि बरंच काही
'बिग बॉस १९'ची थीम यावेळी राजकारण अशी असणार आहे. त्यामुळे आता 'बिग बॉस १९'च्या घरात राजकारण कसं रंगणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. याशिवाय स्पर्धकांना यंदा घरातले काही निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा ‘एव्हिक्शन’ म्हणजेच एलिमिनेशनचा निर्णयही बिग बॉस नव्हे, तर स्पर्धक स्वतः घेणार आहेत. त्यामुळे घरातले वातावरण अधिक वादग्रस्त आणि नाट्यमय होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा बिग बॉस १९ मध्ये एक नवीन तांत्रिक वळणही आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शोमध्ये करण्यात येणार आहे. ही थीम भारतात प्रथमच एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये वापरली जात आहे. या AI चा उपयोग घरातल्या स्पर्धकांना विविध सूचना देण्यासाठी आणि त्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाईल.
कधी सुरु होणार?
'बिग बॉस १९' हा शो ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. आधी शो JioCinema या OTT प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल आणि नंतर कलर्स टीव्हीवर टेलिकास्ट केला जाईल. सुरुवातीचे तीन महिने सलमान खान होस्ट करेल आणि नंतर इतर सेलिब्रिटींचा होस्टिंगमध्ये सहभाग असू शकतो. आणि विशेष म्हणजे 'बिग बॉस १९' यंदा १०० दिवस नाही तर तब्बल पाच महिने खेळवला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार यात शंका नाही.