Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सहभागी झाला आहे. सुरुवातीला प्रणित फारसा खेळत नव्हता. पण, नंतर त्याने त्याचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली. प्रणितला त्याच्या चाहत्यांचाही चांगला सपोर्ट मिळत आहे. अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सही प्रणितसाठी पोस्ट करत आहेत. पण, प्रणितला 'बिग बॉस १९'मध्ये झिरो स्क्रीन टाइम मिळत असल्याचं अंकिता वालावलकरचं म्हणणं आहे.
कोकण हार्टेड गर्लने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने "पहिल्या आठवड्यात मराठी लोकांनी प्रणित मोरेला सपोर्ट केला. गेल्या आठवड्यातही तसंच वातावरण दिसलं. पण, वीकेंड का वारमध्ये प्रणितला जवळपास झीरो स्क्रीन टाइम मिळाला. या आठवड्यातही ते त्याला जास्त स्क्रीनवर दाखवणार नाहीत. आणि मग "तू काहीच करत नाहीस" असं म्हणून त्याला काढून टाकतील. हा एडिटिंगचा खेळ आम्हालाही माहीत आहे. प्रणितसाठी व्होट करा. जय महाराष्ट्र!", असं म्हटलं आहे.
दरम्यान, 'बिग बॉस १९'मध्ये गेल्या आठवड्यातही प्रणित नॉमिनेटेड होता. पण, गेल्या आठवड्यात नॉमिनेशन झालं नाही. त्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर पडला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. यंदाच्या आठवड्यात प्रणित मोरेसह नीलम गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अश्नूर कौर, झीशान कादरी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Web Summary : Ankita Walawalkar criticizes 'Bigg Boss 19' for allegedly giving Marathi comedian Pranit More minimal screen time, accusing the show of manipulative editing. She urges viewers to vote for Pranit, alleging a plot to eliminate him unfairly.
Web Summary : अंकिता वालावलकर ने 'बिग बॉस 19' में मराठी कॉमेडियन प्रणित मोरे को कम स्क्रीन टाइम देने के लिए शो की आलोचना की। उन्होंने शो पर जोड़-तोड़ करने का आरोप लगाया और दर्शकों से प्रणित के लिए वोट करने का आग्रह किया।