Join us

Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:06 IST

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर चुलत बहीण मन्नारा चोप्राला चीयर करण्यासाठी खास पोस्ट केली आहे.

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. विकी जैनच्या एलिमिनेशननंतर आता राहिलेले सर्व सदस्य फायनलपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नावर फारुकी, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) यांचा समावेश आहे. सर्वांचे चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करत आहेत. दरम्यान ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra)  बहीण मन्नारा चोप्राला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे. 

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर चुलत बहीण मन्नारा चोप्राला चीयर करण्यासाठी खास पोस्ट केली आहे. बिग बॉसमधला मन्नाराचा फोटो शेअर करत तिने लिहिले,'तु तुझं सर्वोत्तम दे आणि बाकी गोष्टींचा विचार करु नकोस.carpe diem मन्नारा' असं तिने लिहिलं आहे. यासोबतच प्रियंकाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तसंच प्रियांकाने कामिनी चोप्रा आणि मिताली हांडा यांना टॅग केलं आहे.

काही दिवसांपूर्वीही प्रियंकाने मन्नारासाठी खास मेसेज दिला होता. मन्नाराची मामी आणइ प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा यांनीही मन्नाराला पाठिंबा दिला आहे. मन्नारा प्रियंका आणि परिणितीची चुलत बहीण आहे. मन्नाराची आई ज्वेलरी डिझायनर आहे आणि परिणीती-प्रियंकाच्या वडिलांची बहीण आहे. तर मन्नाराचे वडील वकील आहेत. त्यांना आणखी एक मुलगी आहे जिचं नाव मिताली आहे. मन्नाराने तेलुगू, तमिळ, आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केले आहे.

28 जानेवारी रोजी बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मन्नारा, मुन्नावर आणि अंकिता लोखंडे सर्वात स्ट्राँग स्पर्धक आहेत. आता बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबिग बॉसटेलिव्हिजनसोशल मीडियासलमान खान