Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट, अंकिता लोखंडेसह 'हे' स्पर्धक 'तिकिट टू फिनाले'मधून आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:06 IST

'बिग बॉस 17' हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे.

'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले जवळ आला असून स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक सदस्य महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टास्कमध्ये 100 टक्के देत आहे. 'बिग बॉस 17' हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. कधी या घरातील स्पर्धकांच्या वादाने तर कधी टास्कमधील ट्विस्टने. नुकताच घरात तिकीट टू फिनाले (Ticket To Finale) हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये अनेक स्पर्धकांनी जीव ओतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केला. 

टॉर्चर टास्कमध्ये दोन टीम करण्यात आल्या होत्या. "ब" टीमध्ये अंकिता, विकी, आयशा, ईशा तर "अ" टीममध्ये मुनव्वर, अभिषेक, अरुण, मन्नारा हे होते.  या नव्या टास्कमुळे घरामध्ये जोरदार वाद झाले आणि स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. यावेळी या टास्कमध्ये  "ब" टीमने "अ" टीमला प्रचंड टॉर्चर केलं. इतकंच नाही तर मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुणवर विकी जैनने चक्क मिरचीची पूड फेकली. तकंच नाही तर त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी सुद्धा टाकलं. यानंतर त्यांचीवेळ आली तेव्हा  "ब" टीमने संपुर्ण मसाले लपवून ठेवले. 

 यानंतर बिग बॉसकडून मुनव्वरच्या टीमला "ब" टीम टॉर्चर करणे किंवा त्यांना नॉमिनेट करण्याचे पर्याय देण्यात आले. यावेळी त्यांनी संपुर्ण "ब" टीमला नॉमिनेट केलं आणि याप्रकारे अंकिता, विकी, आयशा ईशा हे  ‘तिकिट टू फिनाले’मधून आऊट झाले. तर अरुण, मुनव्वर फारुखी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे  तिकीट टू फिनाले जिंकून थेट  अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. आता पुढील एलिमिनेशन राऊंडमध्ये नेमकं काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

'बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  या शोचा ग्रँड फिनाले येत्या 28 जानेवारीला होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेसलमान खानसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन