Join us

'बाहेर पडल्यावर निर्णय घ्यावा लागेल'; विकी जैनच्या पोरखेळपणाला कंटाळली अंकिता, घटस्फोटावर केलं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:14 IST

Ankita lokhande: अंकिता आणि विकीमधला वाद आता विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे.

अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी बिग बॉस 17 (bigg boss 17) मध्ये सहभागी झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. अनेकदा या जोडीमधील वाद विकोपाला गेले आहेत. परिणामी, अंकिता विकीच्या बालिशपणाला कंटाळली असून तिने अनेकदा त्याच्यापासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीतर अलिकडेच त्यांचं पुन्हा भांडण झालं आहे. त्यामुळे या घरातून बाहेर पडल्यानंतर काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असं म्हणत तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा शो संपल्यानंतर अंकिता आणि विकी विभक्त होणार की काय? अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर अंकिता आणि विकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विकीने पुन्हा एकदा अंकिताची खिल्ली उडवली आहे. ईशा मालविया एक्सरसाइज करत असताना विकी तिच्याकडे पाहतो आणि अंकिताची चेष्टा करतो. ''जर अंकिता तुझ्यासारखं काही करायला लागली तर तिला ३ लोकांची मदत घ्यावी लागेल", असं विकी म्हणतो. त्यानंतर अंकिता तिच्या वर्कआऊट रुटीनबद्दल सांगत असताना, 'हे सगळं खोटं आहे', असं म्हणत विकीने पुन्हा तिची चेष्टा केली. ज्यामुळे अंकिता संतापली. यातूनच पुढे त्यांचा वाद वाढत गेला. 

अंकिता रागात असताना विकी सतत तिची चेष्टामस्करी करत होता. ज्यामुळे तिच्या रागाचा पारा आणखीनच वाढला. म्हणूनच, "मला कळून चुकलंय की तुझं काम झालंय. त्यामुळे शो संपल्यानंतर मी सुद्धा याविषयी काहीतरी निर्णय घेणार आहे," असं अंकिता म्हणते. दरम्यान, या भांडणामध्ये विकी मला कंटाळलाय म्हणूनच दुसऱ्या मुलींकडे पाहतो, असंही तिने म्हटलं. यापूर्वी अंकिता आणि विकीमध्ये अनेकदा कडाक्याचं भांडण झालं आहे. या भांडणांमध्येही तिने विकीला घटस्फोट घे म्हणून सांगितलं. अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्न केलं. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी ही जोडी एक हॅप्पी कपल म्हणून ओळखली जात होती. मात्र, या शो मध्ये आल्यानंतर त्यांच्या नात्यातील दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर येत आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकार