Join us  

Bigg Boss 16 Promo: ‘बिग बॉस 16’च्या घरात नवा ड्रामा! टीनानं केलं शालीनला किस, अंकित-प्रियंकात बिनसलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 5:30 PM

Bigg Boss 16 Promo : ‘बिग बॉस 16’च्या आजच्या एपिसोडमध्ये नवा ड्रामा बघायला मिळणार आहे.

Bigg Boss 16 Promo :   ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) आजच्या एपिसोडमध्ये नवा ड्रामा बघायला मिळणार आहे. एकीकडे शालीन भनोट ( Shalin Bhanot ) व टीना दत्ताच्या (Tina Datta )प्रेमाला बहर चढला आहे, दुसरीकडे अंकित गुप्ता (Ankit Gupta) व प्रियंका चौधरी (Priyanka Chahar Chaudhary ) यांच्यातील मतभेद वाढत चालले आहेत. 

बिग बॉस 16’च्या आजच्या एपिसोडचे दोन प्रोमो समोर आले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये शालीन व टीनाची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघायला मिळतेय. दोघंही रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहेत. याचदरम्यान टीना शालीनला किस करते आणि आपल्या भावना व्यक्त करते. टीना व शालीनचं हा रोमान्स पाहून सुम्बुल व अब्दु दोघंही शॉक होतात.

अंकित व प्रियंकांत वाददुसऱ्या प्रोमोत अंकित व प्रियंका यांच्यात जोरदार वाद होताना दिसतोय. दोघंही बेडवर बोलत असताना अचानक काहीतरी बिनसतं. इतकं की, अंकित प्रियंकाला जुन्या गोष्टी सांगण्याची धमकी देतो. मैं कॅमेरे के सामने करू पुरानी बातें...., असं तो म्हणतो आणि प्रियंकाचा पारा चढतो. बताओ, आखिर क्या बात बताना चाहते हो, असं म्हणत ती अंकितवर बरसते.एकंदर काय, तर एकीकडे टीना व शालीनचा रोमान्स जोरात आहे. दुसरीकडे प्रियंका व अंकित यांच्या नात्यात कटुता निर्माण झालेली पाहायला मिळतेय.

गेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यात सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम व सुम्बुल तौकीन खान या तिघी नॉमिनेट झाल्या आहेत. आता हळूहळू बिग बॉसच्या घरातील समीकरण बदलताना दिसत आहेत. शिव ठाकरे, गोरी नागोरी आणि एमसी स्टॅन यांच्यातील मैत्रीतही फूट पडताना दिसू लागली आहे. दुसरीकडे शिवला व निम्रीत कौर अहलुवालिया यांची मैत्री बहरते आहे.

टॅग्स :बिग बॉसटिना दत्ता