Join us  

Bigg Boss 16 Grand Finale : आधी गायब, मग अचानक झाली एन्ट्री; अखेर उशीरा का होईना टीना दत्ता फिनालेमध्ये आलीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 7:54 PM

bigg boss 16 grand finale live updates : बिग बॉस १६ चाग्रॅण्ड फिनाले सुरू झाला आहे. या ग्रॅण्ड फिनालेला सगळे स्पर्धक पोहोचलेत, फक्त दिसली नाही ती टीना दत्ता...

Bigg Boss 16 Grand Finale Live Updates : बिग बॉस १६ चा ग्रॅण्ड फिनाले सुरू झाला आहे. या ग्रॅण्ड फिनालेला सगळे स्पर्धक पोहोचलेत, फक्त दिसली नाही ती टीना दत्ता. बिग बॉसच्या घरातून बाद झालेले सर्व स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेला पोहोचलेत, सौंदर्या शर्मा, गोरी नागोरी, अंकित गुप्ता, साजिद खान, अब्दु रोझिक, निम्रत अहलूवालिया, सुम्बुल तौकिर खान अशा सगळ्यांनी फिनाले नाईटला हजेरी लावली. टीनाने मात्र या नाईटला हजेरी लावणं टाळलं, टीना फिनाले नाईटला का आली नाही, याची लगेच चर्चा सुरू झाली.  तिची गैरहजेरी अनेकांना खटकली. पण उशीरा का होईना अखेर टीना शोमध्ये आली. एक अंक संपल्यानंतर टीनाची फिनालेमध्ये एन्ट्री झाली.

ग्रॅण्ड फिनालेआधीच काही दिवस टीना शोमधून बाद झाली होती. टीना शोची दमदार स्पर्धक होती. पण अचानक शोमध्ये तिचा गेम बिघडला होता. खेळापेक्षा तिच्या शालीनच्या नात्याची, रोमान्सचीच अधिक चर्चा रंगली. पुढे याच शालीनसोबतचा तिचा वादही गाजला. दोघांमध्येही इतका टोकाचा वाद झाला की, शेवटी शेवटी दोघं एकमेकांचं तोंड पाहणंही पसंत करत नसतं. घरात असताना टीनावर अनेक आरोप झालेत. तिचा गेम प्लान आधीच ठरला होता. तिने गेमसाठी शालीनसोबत प्रेमाचं नाटक केलं, असे अनेक आरोप  तिच्यावर झालेत.

टीना दत्ताने प्रियंकाच्या समोर शालीनची अनेक गुपिते उघड केली. टीनाने सांगितले की, घरात येण्यापूर्वी शालीनने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी शालीनने तिला ऑफर देखील दिली होती की, ते दोघे या घरात एकत्र खेळू शकतात आणि त्यांच्या टीममध्ये गौतम विग आणि साजिद खान देखील असतील. टीनाच्या या खुलाशानंतर प्रियंकाला धक्का बसला. तिने म्हटले की, याचा अर्थ तो सगळं काही बाहेरूनच ठरवून आला आहे. यावेळी टीना म्हणाली की, त्याने माझ्याकडे अंतर्वस्त्रांची मागणी देखील केली होती.

टॅग्स :बिग बॉसटिना दत्ता