Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लोकं म्हणायचे बाळ पोटात आहे तोपर्यंत...'; आई झाल्यानंतर भारती सिंहने पहिल्यांदाच शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 17:57 IST

Bharti Singh: भारतीचा आई झाल्यानंतरचा अनुभव जाणून घेता यावा यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच आता भारतीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आई झाल्यानंतर कसं वाटतंय हे सांगितलं आहे.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी लाफ्टर क्वीन म्हणजे भारती सिंह (Bharti Singh) .  काही दिवसांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारतीच्या बाळाची एक झलक पाहाता यावी किंवा भारतीचा आई झाल्यानंतरचा अनुभव जाणून घेता यावा यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच आता भारतीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आई झाल्यानंतर कसं वाटतंय हे सांगितलं आहे.

मध्यंतरी आई होण्यापूर्वी भारतीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी जातानाही भारती, हर्ष आणि त्यांच्या बाळाला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, यावेळी बाळ खूपच लहान असल्यामुळे भारतीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.मात्र, आता घरी गेल्यानंतर तिने तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

भारती सिंहच्या बाळाचा पहिला व्हिडीओ आला समोर; पहिल्यांदाच एकत्र दिसलं लिंबाचिया कुटुंबीय

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या भारतीने  इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या आई झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. "सगळे म्हणायचे जोपर्यंत बाळ पोटात आहे तोपर्यंत मज्जा करुन घे. बाळ बाहेर आल्यानंतर सगळी मज्जा संपेल. पण मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते, आता उलट मला जास्त मज्जा येते", असं कॅप्शन देत भारतीने तिचा अनुभव शेअर केला आहे.

दरम्यान, भारतीने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. अनेकांनी तिच्या बाळाचा फोटो शेअर करायची मागणीही भारतीकडे केली आहे.

टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार