प्रसिद्ध कॉमेडी कलाकार भारती सिंग तिच्या युट्यूब चॅनलद्वारे वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध अपडेट्स शेअर करताना दिसते. भारतीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तिने घरात असलेल्या 'लाबूबू' बाहुलीला सर्वांसमोर जाळून टाकलं. हे सर्व तिने आपल्या यूट्यूब व्लॉगमध्ये दाखवलं आहे. याशिवाय बाहुली का जाळली? याचं कारणही सांगितलं. जाणून घ्या
भारतीने लाबूबू डॉल का जाळली?
भारतीच्या म्हणण्यानुसार, ही बाहुली घरी आल्यापासून तिचा मुलगा गोला खूप चिडचिडा, हट्टी आणि आक्रमक वागू लागला होता. त्याच्या वागणुकीत अचानक झालेले हे बदल पाहून भारती चिंतेत आली होती. तिला असं वाटू लागलं की या बाहुलीमुळेच काहीतरी उलटसुलट होत आहे. त्यामुळे तिने ही बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला. व्लॉगमध्ये ती परगीत नावाच्या घरातल्या बाईसोबत बाहुलीला पेटवत असल्याचं स्पष्ट दिसतं. पेटवताना भारती म्हणते, “लाबूबू जळाली, वाईट शक्ती गेली.” हे करताना ती थोडीशी हसते, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीही दिसून येते.
भारतीचा पती हर्ष लिंबाचियाने तिच्या या कृतीवर थोडं हसत तिला “अंधश्रद्धाळू” म्हणत टोमणा मारला. पण भारतीने स्पष्ट सांगितलं की, “हो, मी अंधश्रद्धाळू असेन, पण माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे.” ही घटना व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी भारतीच्या भावनांना समजून घेत पाठिंबा दिला, तर काहींनी अशा प्रकारचं वागणं चुकीचं आणि अंधश्रद्धेचं उदाहरण असल्याचं म्हटलं. भारती सध्या लाफ्टर शेफ्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे.