Join us

'भाग्य दिले तू मला'फेम 'ही' अभिनेत्री आहे शिवा; तुम्ही ओळखल का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:56 IST

Marathi actress: शिवा मालिकेत तिचा लूक बदलल्यामुळे अनेक जण तिला ओळखू शकले नाहीत.

सध्या झी मराठीवर दोन नवीन मालिका चांगल्याच चर्चेत येत आहेत. यात पहिली मालिका म्हणजे पारु आणि दुसरी शिवा. या मालिका सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये त्यांची चर्चा रंगली आहे. यात खासकरुन शिवा या मालिकेत रांगडी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सर्वाधिक चर्चा होतांना दिसत आहे. ही अभिनेत्री  कोण आहे? यापूर्वी तिने कोणत्या मालिकेत काम केलंय,असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी या अभिनेत्रीने भाग्य दिले तू मला या मालिकेत काम केलं आहे.

शिवा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या पात्राचं नाव शिवानी पाटील असं आहे. संघर्षनगर नावच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय, कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे ही तिची खासकरुन ओळख. शिवाच्या घरात तिची आई, आजी आणि मोठी बहीण असा परिवार असून वडिलांच्या अकाली निधनामुळे घरची जबाबदारी तिच्यावर पडली. 

या मालिकेत शिवा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे. यापूर्वी तिने भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीच्या मैत्रिणीची म्हणजेच वैदेहीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे शिवा या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच पूर्वाच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दरम्यान, शिवा या मालिकेत पूर्वाव्यतिरिक्त शाल्व किंजवडेकर, समीर पाटील, मीरा वेलणकर आणि सविता मालपेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार