Join us

भाग्य दिले तू मला: घरखर्च चालण्यासाठी कावेरी घेणार मोठा निर्णय; राज देईल का तिची साथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:02 IST

Tv serial: किमयाने कावेरीला एक सल्ला दिला आहे. त्यामुळे कावेरी आता त्या दिशेने वाटचाल करणार आहे.

कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.  या मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. सध्या राज आणि कावेरी यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत आहे. राजेशाही थाटात वाढलेल्या राज आणि रत्नमाला मोहिते यांना त्यांचं राहतं घर सोडून भाड्याच्या घरात रहावं लागत आहे. मात्र, या परिस्थितीमध्येही कावेरीने त्यांची साथ सोडलेली नाही. विशेष म्हणजे आता कावेरीने तिच्या संसाराला हातभार लावण्यासाठी एक निर्णय घेतला आहे.

घरच्या लोकांनी फसवल्यामुळे राजला माहेरचा चहा या त्याच्या हक्काच्या कंपनीमधून पाय उतार करावा लागला. त्यामुळे सध्या तो एका कंपनीमध्ये नोकरी करत आहे. परंतु, या कंपनीत नोकरी करताना त्याला केवळ २५ हजार रुपये पगार मिळत आहे. या पगारामध्ये घर भाडं देणं, घराचा महिन्याचा खर्च चालवणं हे सगळं करताना त्याची तारेवरची कसरत होते. त्यामुळेच कावेरीने आता नोकरी करायचा निर्णय घेतला आहे. राजच्या टीम लीडरने किमयाने कावेरीला नोकरी करायचा सल्ला दिला. ज्यामुळे कावेरी आता नोकरी करण्याच्या दिशेने विचार करते.

दरम्यान, किमयाचा सल्ला कावेरी आणि रत्नमाला यांना पटलेला आहे. परंतु, आता राज कावेरीला नोकरी करायची परवानगी देईल का? कावेरीच्या नोकरी करण्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल का? की नवा वाद निर्माण होईल हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी