Join us

गुडन्यूज! ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’मधील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:36 IST

Balumamachya Navana Changbhala : नुकताच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. आता मराठी टीव्ही विश्वातील आणखी  एका लोकप्रिय अभिनेत्रीनं साखरपुड्याची गोड बातमी शेअर केली आहे.

नुकताच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या टेलिव्हिजनच्या लोकप्रिय जोडप्यानं साखरपुड्याची बातमी शेअर करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता मराठी टीव्ही विश्वातील आणखी  एका लोकप्रिय अभिनेत्रीनं साखरपुड्याची गोड बातमी शेअर केली आहे. होय, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ (Balumamachya Navana Changbhala ) या मालिकेत सखूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता उत्तरवार (Amruta Uttarwar) हिचा नुकताच साखरपुडा पार पडला.

अमृताने विशाल बोनगिरवारसोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, तिने याबद्दलची माहिती दिली आहे. ‘या दिवसापासून पुढे आपण कधीही एकटे नसू...’, असं कॅप्शन देत तिने साखरपुड्याचा खास फोटो शेअर केला आहे.  

अमृताने साऊ माझी सौभाग्याची, त्या चार योनींची गोष्ट, आयुष्य, घेतला वसा टाकू नको, नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त  अशा चित्रपट, नाटक, शॉर्टफिल्म आणि मालिकांमधून  महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अमृता ही इंजिनिअर आहे.

इंजिनिअरिंग केल्यानंतर काही काळ तिने नोकरी केली. पण नोकरीत मन रमेना म्हटल्यावर तिनं हौसी रंगभूमीवर काम करणं सुरू केलं. मग मात्र तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले या नाटकात तिला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं नाव चर्चेत आलं. ‘मनोधैर्य’ या चित्रपटात तिने किशोरी शहाणे सोबत मुख्य नायिकेची भूमिका  साकारली. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंटेलिव्हिजनटिव्ही कलाकार