Join us

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं'मध्ये एन्ट्री; 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 09:55 IST

Marathi actor: 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं'मध्ये एन्ट्री; सुमितऐवजी 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावर विशेष गाजत असलेली मालिका म्हणजे बाळू मामाच्या नावानं चांगभलं. २०१८ मध्ये सुरु झालेल्या या मालिकेची लोकप्रियता आज ५ वर्षानंतरही कमी झालेली नाही. आतापर्यंत या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे, बाळूमामांची भूमिका साकारत होता. मात्र, आता त्याने या मालिकेतून काढता पाय घेतला असून त्याच्या जागी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुमीतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही मालिका सोडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली असून हा अभिनेता या पुढे बाळू मामांची भूमिका साकारणार आहे. कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर करत या अभिनेत्याचा फर्स्ट लूक दाखवला आहे.

नुकतीच बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेत सुंदरा मनामध्ये भरली या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा आता नवा अध्याय सुरु होणार असून या अध्यायापासून अभिनेता प्रकाश धोत्रे बाळूमामाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

दरम्यान, प्रकाश धोत्रे यांनी यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेमध्ये ते लतिकाच्या सासऱ्यांच्या म्हणजेच आप्पा जहागीरदार यांच्या भूमिकेत झळकले होते. आजवरच्या कारकिर्दीत प्रकाश यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमामध्ये काम केलं आहे. तसंच ते नाटकांमध्येही झळकले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता