Join us

नवखी चाहूल इवलं पाऊल! ३३ व्या वर्षी ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 06:59 IST

वयाच्या ३३ व्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (smriti khanna)

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येतेय. ती म्हणजे 'बालिका वधू' फेम अभिनेत्री स्मृती खन्ना दुसऱ्यांदा आई होणार आहे. स्मृती आणि तिचा पती गौतम गुप्ता आयुष्यात दुसऱ्यांदा नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. स्मृतीने पती, पहिली मुलगी अनयका आणि त्यांचा पाळीव कुत्रा यांच्यासोबत बेबी बंप दाखवत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या आनंदात स्मृतीने हे खास फोटो शेअर केलंत कॅप्शन लिहिलंय की, "आयुष्याचा हा प्रवास अपेक्षेपेक्षा अधिक आव्हानांंनी भरला आहे. याच खाचखळग्यांच्या प्रवासात ही सुंदर घोषणा करत असताना आम्ही भावूक झालो आहोत. आमचे कुटुंब वाढत आहे! आमची लाडकी मुलगी अनयका आहे. आता अनयका लवकरच मोठी बहिण होईल आणि आमचा कुत्रा लुकास सर्वात चांगला मोठा भाऊ बनणार आहे." 

याआधी टीव्ही अभिनेत्री स्मृती खन्ना गौतम गुप्ता या दोघांनी  2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे  अनयकाचे स्वागत केले. स्मृती - गौतम - अनयका आणि त्यांचा पाळीव कुत्रा असलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. याशिवाय अनेकांनी स्मृतीचं कमेंटमध्ये अभिनंदन करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. स्मृतीने 'मेरी आशिकी तुमसे ही', 'ये है आशिकी', 'बालिका वधू' आणि 'इस प्यार को क्या नाम दूं सीजन 3' या मालिकांमध्ये काम केलंय.

टॅग्स :मदर्स डेबेबीज डे आऊटटेलिव्हिजन