Join us
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया करुन वजन कमी केलं? राम कपूरने स्पष्टच सांगितलं; म्हणाला- "३० सेकंदांपेक्षा कमी वेळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:36 IST

"मी काहीही चुकीचं केलेलं नाही", ट्रान्स्फॉर्मेशनवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना राम कपूरचं रोखठोक उत्तर

Ram Kapoor :राम कपूर (Ram Kapoor) हा टेलिव्हिजन विश्वातील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘बडे अच्छे लगते है’ ही त्याची मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील राम कपूर आणि प्रियाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आजही घर केलं. परंतु मागील काही दिवसांपासून राम कपूरची त्याच्या जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशनमुळे चर्चा होताना दिसते. अभिनेता राम कपूरनेही तब्बल ५५ किलो वजन घटवलं आहे. त्याचं हे थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याला चाहते अनेक प्रश्न विचारत आहेत. यावर सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत आपल्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितलं आहे.

एकेकाळी राम कपूर अतिशय लठ्ठ होता, पण आता त्याने प्रचंड मेहनत घेत आपलं वजन कमी केलं आहे. यावर मीडियात सुद्धा खूप चर्चा रंगली. नुकताच सोशल मीडियावर राम कपूरने एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या चाहत्यांच्या मनातील शंका दूर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने म्हटलंय की, "काय चालू आहे, माझी इंस्टा फॅमिली? तुम्ही लोक कसे आहात? अलिकडेच माझ्या ट्रान्स्फॉर्मेशची बातमी व्हायरल झाल्यानंतर, बरेच लोक सातत्याने मला विचारत आहेत की, मी ओझेम्पिक किंवा शस्त्रक्रिया केली आहे का? तर त्यांना मला पहिल्यांदा सांगायचं आहे की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यानंतर अभिनेता व्हिडीओमध्ये आपले ट्रायसेप्स बायसेप्स दाखवत म्हणतो, "पण आता, ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात, मी हे सिद्ध करुन दाखवणार आहे की मी असं काहीही केलं नाही. मी अजूनही यासाठी मेहनत घेत आहे. हे सर्वोत्तम ट्रान्स्फॉर्मेशन नाहीच आहे. पण मुद्दा असा आहे की, या अशा ट्रान्स्फॉर्मेशनसाठी कठोर परिश्रम आणि तुमचा वेळ महत्वाचा असतो. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, कोणतीही शस्त्रक्रिया नाही, ज्यामुळे केवळ तुमचं वजन कमी होऊ शकतं, असा बदल होणार नाही."

राम कपूरने व्हिडिओमध्ये पुढे म्हटलंय की , "४ ते ६ महिन्यांत, मला रॉक-सॉलिड सिक्स-पॅक बनवायचे आहेत. आणि ते केवळ कठोर परिश्रम आणि सातत्य असेल तर शक्य आहे. " अशा निर्धार देखील त्याने केला आहे. 

टॅग्स :राम कपूरटिव्ही कलाकारसोशल मीडिया