लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सर्वच कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. याच मालिकेतील असंच एक चर्चेत राहिलेली व्यक्तिरेखा म्हणजे बबिता. अभिनेत्री मुनमुन दत्ताने बबिताची भूमिका साकारली आहे. मुनमुन गेल्या काही भागांपासून मालिकेत दिसत नाहीये. ती जणू गायब आहे. त्यामुळे बबिताने शो सोडलाय का, अशी चर्चा सुरु आहे. अखेर बबिताने अर्थात मुनमुनने फोटो शेअर करुन यामागचं खरं कारण सांगितलं आहे. म्हणून बबिता मालिकेत दिसत नाहीये
गेल्या काही दिवसांपासून बबिता मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे बबिताने मालिकेतून एक्झिट घेतलीय का, अशा चर्चांना उधाण आले होते. अनेक चाहत्यांनी याविषयी विचारणा केली की, “बबिताजी कुठे आहेत?” या सगळ्यावर अखेर मुनमुन दत्तानेच सोशल मीडियावरून उत्तर दिलं आहे. मुनमुनने परदेश प्रवासाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मुनमुन परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय. त्यामुळे मुनमुनने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडली नसून ती सध्या काहीवेळ ब्रेक घेऊन फॉरेनला भटकंती करताना दिसतेय.
शोमधील सध्याच्या कथानकात जेठालाल आणि बबिता दोघेही दिसत नाहीत. सध्याच्या कथानकात दाखवलं आहे की, बबिता महाबळेश्वरला गेली आहे आणि जेठालाल बिझनेस ट्रिपवर आहे. पण त्यांची प्रत्यक्ष अनुपस्थिती पाहून प्रेक्षक चिंतेत होते. पण दोघांनीही मालिका सोडली नसून सध्या ते ब्रेकवर आहेत, असं दिसतंय. त्यामुळे 'तारक मेहता..'च्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. जेठालाल आणि बबिता पुढील काही दिवसांमध्ये लवकरच मालिकेत पुन्हा दिसतील, अशी चाहत्यांना आशा आहे.