Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन दयाबेनसाठी ऑडिशन सुरु! निर्माते असित मोदी म्हणाले, "मला अजूनही आशा आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:13 IST

अभिनेत्री दिशा वकानीने 10 वर्ष मालिकेत दयाबेनची भूमिका निभावली आणि एक बेंटमार्क सेट केला.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र पडद्यामागे घडलेल्या काही मतभेदांमुळे अनेक कलाकारांनी मालिका सोडली. तर मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) मालिकेत कधी परत येणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र दिशाचा कमबॅकचा कोणताही विचार नसल्याचं आता समोर आलं आहे. इतकंच नाही तर नव्या दयाबेनसाठी ऑडिशन सुरु झाले आहेत.

अभिनेत्री दिशा वकानीने 10 वर्ष मालिकेत दयाबेनची भूमिका निभावली आणि एक बेंटमार्क सेट केला. तिच्या बोलण्याची स्टाईल, गरबा खेळण्याचा अंदाज सगळंच निराळं होतं. 2017 रोजी ती मॅटर्निटी लीव्हवर गेली आणि नंतर मालिकेत परतलीच नाही. दिशाला चाहत्यांनी खूप मिस केले. दिशा मालिकेत परत येणार का यावर अखेर निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'एक दोन महिन्यात दयाबेन परत येईल अशी आशा आहे. चाहतेही खूप उत्सुक आहेत. कोणा दुसऱ्या अभिनेत्रीसाठी दयाबेनची भूमिका करणं खूपच आव्हानात्मक असणार आहे. या भूमिकेसाठी आम्हाला एका शानदार अभिनेत्रीची गरज आहे.'

ते पुढे म्हणाले, 'मी नेहमीच आयुष्यात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. तसंही म्हणतात ना काहीही शक्य आहे. मला आशा आहे दिशा वकानी कमबॅक करेल, पण मी आता या भूमिकेसाठी ऑडिशन्सला सुरुवात केली आहे. दिशा तिच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे. तिच्या योगदानासाठी मी तिचे आभार मानतो. तसंच आता माझ्यासमोर दोन आव्हानं आहेत. एक म्हणजे दयाभाभीला आणायचं आणि दुसरं म्हणजे पोपटलालच्या लग्नाविषयी विचार करावा लागणार आहे.'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' १५ वर्षांपासून अजूनही यशस्वीपणे सुरुच आहे. दिशा वकानी नंतर शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री यांसारखे अनेक कलाकार शो सोडून गेले आहेत. सर्वांनी निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तारक मेहताचा पडद्यामागचा वाद चर्चेत आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन