Join us

अशोक सराफ यांच्या घरी पोहोचले आशुतोष अन् तेजश्री प्रधान; शुभ्रा-बबड्याला एकत्र पाहून चाहते खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:35 IST

कित्येक दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे.

'होणार सून मी या घरची' या सुपरहिट मालिकेनंतर अभिनेत्री तेजश्री प्रधानची (Tejashree Pradhan) गाजलेली मालिका ती म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई'. यामध्ये निवेदिता सराफ यांनी तिच्या सासूची भूमिका केली होती. तर अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच बबड्याच्या भूमिकेत होता. तर तेजश्री शुभ्रा ही व्यक्तिरेखा साकारत होती. प्रेक्षकांना शुभ्रा आणि बबड्याची जोडी जाम आवडली. कित्येक दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाला. यानिमित्ताने संपूर्ण कलासृष्टीतून त्यांचं भरभरुन अभिनंदन करण्यात आलं. अनेकांनी अशोक सराफ यांची घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन केलं. यानिमित्ताने तेजश्री आणि आशुतोषही अशोक सराफ यांच्या घरी पोहोचले. त्यांना फुलांचा गुच्छ देत त्यांनी फोटोही काढला. निवेदिता सराफ यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

तेजश्री आणि आशुतोषला एकत्र पाहून चाहते मालिकेच्या आठवणीत रमले. शुभ्रा आणि बबड्या अशी कमेंट करत चाहत्यांनी परफेक्ट फोटो अशी प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेत बबड्या हा आसावरीचा म्हणजेच निवेदिता सराफ यांचा लाडका असतो. आशुतोषला पुन्हा एखाद्या मालिकेत बघण्याची इच्छाही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. तर तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत आहे. तिच्या याही मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय.

टॅग्स :तेजश्री प्रधान आशुतोष पत्कीअशोक सराफमराठी अभिनेताटिव्ही कलाकार