Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:41 IST

Jyotsna Patil: मोनाने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची डान्स स्टेप फॉलो केली आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड खासकरुन कलाकार मंडळी लगेच फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर पुष्पा 2 या सिनेमातील सामी सामी हे गाणं तुफान व्हायरल होतंय. या गाण्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांची एक डान्स स्टेप प्रचंड व्हायरल झाली असून अनेकांनी ती स्टेप फॉलो केली आहे. यात अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील मोना हिला सुद्धा या गाण्यावर रील करायचा मोह आवरला नाही.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अभिनेत्री जोत्स्ना पाटील हिने दिप्याच्या पत्नीची मोनाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मालिकेत नव्याने एन्ट्री झालेली मोना अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे तिचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मोनाने म्हणजेच जोत्स्ना पाटील हिने  'अंगारो के अंबर सा मेरा सामी...' या गाण्यावर अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची डान्स स्टेप फॉलो केली आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, जोत्स्ना या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली आहे. सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय असून कायम सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंड ती फॉलो करत असते. यापूर्वीही तिने अनेक ट्रेंडिंग रिल्स फॉलो केले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनरश्मिका मंदानाअल्लू अर्जुनसेलिब्रिटीसिनेमा