Join us

Video: अखेर अप्पीला परत मिळणार तिचं बाळ; संकल्प-मनी मावशीचं सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:45 IST

Appi amchi collector: अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर'. सध्या या मालिकेत अप्पी आणि अर्जुन यांच्या जीवनात अनेक चढउतार येत आहेत. या दोघांचं बाळ त्यांच्या डोळ्यासमोर असूनही ते त्याला जवळ करु शक नाहीयेत. परंतु, अप्पी तिचं बाळ मिळवण्यासाठी शक्य होईल तितके प्रयत्न करत आहे. यामध्येच आता मनीमावशी आणि संकल्प यांचं बाळ चोरण्याचं सत्य समोर येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यात संकल्प आणि मनी मावशीने अपर्णाचं बाळ चोरल्याचं सत्य समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडाला काळ फासून आता आख्ख्या गावातून त्यांची धिंड काढण्यात आली आहे.

अपर्णाने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ मृत पावल्याची खोटी माहिती हॉस्पिटलमधून अर्जुन आणि त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अप्पीचं बाळ संकल्प आणि मनीमावशी यांनी डाव रचून बाळांची आदलाबदल केली होती. इतकंच नाही तर अप्पीजवळ मृत पावलेलं मूल ठेवलं होतं. त्यामुळे अप्पीचं बाळ जन्मानंतर काही तासांमध्येच गेलं असा समज घरातल्यांचा झाला होता. मात्र, बाळ जीवंत असल्याचा दाट संशय अपर्णाला होता त्यामुळे ती त्या दिशेने शोध घेते आणि अखेर सत्य तिच्या समोर आलं आहे.

दरम्यान, स्वप्नील आणि रुपालीकडे असलेलं बाळ अपर्णाचं असल्याचं सत्य तिने शोधून काढलं आहे. इतकंच नाही तर बाळ पळवण्यामागे संकल्प आणि मनी मावशीचा हात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आता या दोघांना अप्पी कोणती शिक्षा देणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार