Marathi Actress Buy New House: मुंबई-पुण्यासारख्या शहरात आपलं हक्काचं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं.यंदाच्या वर्षात अनेक कलाकारांचं घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आणखी एका मराठी अभिनेत्रीने नवीन घर खरेदी करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत झळकलेल्या या अभिनेत्रीने पुण्यात स्वत:च घर खरेदी करत नुकताच तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
अप्पी आमची कलेक्टर या मराठीच्या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईक तसेच रोहित परशुरामने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दरम्यान, अप्पी आमची कलेक्टरमध्ये अभिनेत्री नीलम वाडेकरने पियू म्हणजेच प्रियांका नावाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. नुकताच नीलमने हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे.
नुकताच नीलमने तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या साथीने नव्या घरात पाऊल ठेवलं आहे. याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. "No legacy handed over. This one is earned...", असं खास कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, नीलमने शेअर केलेल्या या व्हिडीओ नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींना लाईक्स आणि कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान,नीलम वाडकरबद्दल सांगायचं झालं तर, तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अप्पी आमची कलेक्टर मालिकेसह अभिनेत्रीने आई तुळजाभवानी, बरड अशा कलाकृतीतून काम केलं आहे. नुकतंच नीलमने हक्काच घर खरेदी केलं असून काल त्यांचा या नवीन घरात गृहप्रवेश झाला. सध्या ती ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत काम करताना पाहायला मिळतेय.
Web Summary : Marathi actress Neelam Wadekar, known for 'Appi Amchi Collector,' bought a new house in Pune. She shared the news with fans, posting a video of the housewarming ceremony. Celebrities and fans congratulated her on social media. She currently stars in 'Tujhyasathi Tuzyasanga'.
Web Summary : मराठी अभिनेत्री नीलम वाडेकर, जो 'अप्पी आमची कलेक्टर' के लिए जानी जाती हैं, ने पुणे में एक नया घर खरीदा। उन्होंने प्रशंसकों के साथ खबर साझा की, गृहप्रवेश समारोह का एक वीडियो पोस्ट किया। सोशल मीडिया पर हस्तियों और प्रशंसकों ने उन्हें बधाई दी। वह वर्तमान में 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' में अभिनय कर रही हैं।