Join us

अप्पी आमची कलेक्टर: अर्जुनला उमगणार त्याची चूक; पण, अप्पी करेल का त्याला माफ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:43 IST

Appi amchi collector:अर्जुन, कदमांना अप्पी भेटल्याचं सांगतो. त्यावर, जे झालं ते विसरुन जा असा सल्ला ते अर्जुनला देतात.

छोट्या पडद्यावर सध्या अप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुफान गाजत आहे. आतापर्यंत या मालिकेत अर्जुन आणि अप्पी यांच्या आयुष्यात आलेलं प्रत्येक वळण प्रेक्षकांनी एन्जॉय केलंय. यामध्येच आता या मालिकेत पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आहे. तब्बल ७ वर्षानंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. परंतु, ७ वर्षांच्या या प्रदीर्घ काळात त्यांच्या नात्यात बराच दुरावा आला आहे. त्यामुळे अप्पी आपल्याला माफ करणार नाही, हे अर्जुनला पूरतं कळलं आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अर्जुन, कदमांना अप्पी भेटल्याचं सांगतो. त्यावर, जे झालं ते विसरुन जा आणि अप्पी, अमोलला पुन्हा घरी आण असं कदम त्याला सांगतात. परंतु, या ७ वर्षांमध्ये आपण त्या दोघांनाही एकटं सोडल्यामुळे अप्पी चांगलीच दुखावली गेल्याचं अर्जुन सांगतो. इतकंच नाही तर ती कधीच आपल्याला माफ करणार नाही हे सुद्धा तो त्यांना सांगतो.

दरम्यान, पुण्यात परतलेल्या अप्पीची गडावर अर्जुनसोबत भेट होते. या भेटीमध्ये तो अमोलला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. मात्र, ७ वर्ष त्या दोघांना एकटं सोडल्यामुळे अप्पी प्रचंड दुखावली आहे. ज्यामुळे तिने अर्जुन आणि अमोल यांची भेट घडवून आणण्यास साफ नकार दिला आहे. आता या मालिकेत पुढे काय होणार? अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का?या प्रश्नांची उत्तरं मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी