Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anupama: वनराज बनणार ‘कबाब में हड्डी’, संपता संपेना अनुपमाच्या आयुष्यातलं दु:ख...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:49 IST

Anupama: मालिकेत येणार हे पाच मोठे ट्विस्ट...‘अनुपमा’ मालिकेत अनुपमा व अनुज लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. अनुपमा खूश्श आहे. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणारा नाही...

‘अनुपमा’ या मालिकेत अनुपमा व अनुज लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. सध्या शाह कुटुंबात अनुज व अनुपमाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. अनुपमा खूश्श आहे. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणारा नाही, हेही पक्क आहे. लग्नानंतर अनुपमाच्या आयुष्यात नवं विघ्न येणार आहे. होय, अनुपमाच्या आयुष्यात नव्या अडचणींचा संपूर्ण प्लॉट मेकर्सनी आधीच तयार केला आहे. एकंदर काय तर येणाऱ्या दिवसांत अनुपमा मालिकेत आणखी नवंनवे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत.

अनुजच्या कुटुंबाची होणार वापसी...बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अनुपमाच्या लग्नानंतर मालिकेत अनुजच्या कुटुंबाची एन्ट्री होणर आहे. अनुजच्या कुटुंबातील काही माणसं अनुपमाचं जगणं मुश्किल करणार आहेत.

शाह कुटुंबाला सोडू शकणार नाही अनुपमा...लग्नानंतर अनुपमा कपाडिया हाऊसमध्ये राहायला जाईल. पण शाह कुटुंबाला ती विसरू शकणार नाही. अशात ती शाह हाऊस व कपाडिया हाऊसच्या फेऱ्या मारताना दिसेल.

वनराज बनणार ‘कबाब में हड्डी’वनराज हा अनुपमा व अनुजच्या संसारात ‘कबाब में हड्डी’ बनेल. दोघांचं लग्न तोडण्याचे अनेक प्रयत्न तो करेल.  अनुज  व अनुपमाच्या लग्न मोडल्याचा आनंद एकदिवस नक्की साजरा करेल, अशी शपथ तो अगदी लग्नाच्या मंडपातच घेईल.

सुरू होणार अनुज व अनुपमाचे वादलग्नानंतरही अनुपमा वनराज व आपल्या मुलांमध्येच गुंतलेली दिसेल. सुरूवातीला अनुज या सगळ्यासाठी तिला सपोर्ट करेल. पण नंतर वनराजमुळे दोघांत मतभेद वाढायला लागतील.

होणार नवी एन्ट्रीलग्नानंतर अनुपमा व अनुज नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहेत. अशात मेकर्सनी मालिकेत काही नवीन पात्र आणण्याचा विचार सुरू केला आहे. लवकरच काही नवीन पात्रांची मालिकेत एन्ट्री होईल.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्टार प्लस