Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य थाट अन् पारंपरिक साज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:29 IST

साउथ इंडियन स्टाईलमध्ये अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे

टीव्ही इंडस्ट्रीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मालिका 'अनुपमा'मध्ये 'राही'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अद्रीजा रॉय (Adrija Roy) हिच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे. अद्रीजाने तिचा बॉयफ्रेंड विघ्नेश अय्यर याच्याशी साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर तिने या खास क्षणाचे पहिले फोटो शेअर केले असून, चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अद्रीजाने तिच्या साखरपुड्यासाठी पारंपरिक लूकला पसंती दिली होती. तिने लाल रंगाची सुंदर कांजीवरम साडी परिधान केली होती, ज्यावर सोन्याचे दागिने तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. दुसरीकडे, तिचा होणारा पती विघ्नेश याने पांढऱ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. या जोडीचा हा 'दाक्षिणात्य लूक' सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोण आहे विघ्नेश अय्यर?विघ्नेश अय्यर हा अद्रीजाचा खूप जुना मित्र आहे. या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मनोरंजन विश्वात गेल्या काही काळापासून रंगत होत्या, मात्र साखरपुडा करून त्यांनी आता आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. विघ्नेश हा मूळचा दक्षिण भारतीय असल्याने या समारंभात दोन्ही संस्कृतींचा संगम पाहायला मिळाला.

अद्रीजाने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना एक भावुक कॅप्शनही दिले आहे. तिने तिच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'अनुपमा' मालिकेतील तिचे सहकलाकार आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी कमेंट्सच्या माध्यमातून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. साखरपुडा पार पडल्यानंतर आता ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adrija Roy, 'Anupama' fame, gets engaged to boyfriend in traditional style!

Web Summary : Actress Adrija Roy, known for her role in 'Anupama,' is engaged to Vignesh Iyer. The couple celebrated with a traditional South Indian ceremony. Adrija looked stunning in a Kanjivaram saree, while Vignesh wore a traditional white outfit. Their photos are trending as congratulations pour in.
टॅग्स :लग्नटेलिव्हिजनटिव्ही कलाकार