Join us

‘अनुपमा’ फेम रूशाद 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर, मराठमोळ्या केतकीची बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:08 IST

Rushad Rana : रुशाद आणि केतकी हे दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहे. ‘अनुपमा’च्या सेटवर 2020 साली रूशाद व केतकी यांची भेट झाली होती.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता रूशाद राणा ( Rushad Rana) वयाच्या 43 व्या वर्षी  लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ‘अनुपमा’ मालिकेतून लोकप्रिय झालेला हा अभिनेता दुसऱ्यांदाबोहल्यावर चढणार आहे. येत्या 4 जानेवारीला तो त्याची मैत्रिण केतकी वालावलकर (Ketaki Walawalkar) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 

रुशाद आणि केतकी हे दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहे. ‘अनुपमा’च्या सेटवर 2020 साली रूशाद व केतकी यांची भेट झाली होती. केतकी ही ‘अनुपमा’ची क्रिएटीव्ह डायरेक्टर आहे. 2013 साली रूशदचा घटस्फोट झाला. यानंतर अनेक वर्षे रूशाद सिंगल होता. मात्र 2020 रूशाद केतकीला भेटला. अर्थात यादरम्यानही दोघांत काहीही नव्हतं. यानंतर एका डेटींग अ‍ॅपवर रूशाद व केतकी एकमेकांच्या संपर्कात आले आणि मग दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली.

रुशाद हा पारसी असून केतकी ही महाराष्ट्रीयन आहे.  रुशाद अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. अनेक हिंदी मालिका, वेब सीरिज व चित्रपटांत त्याने काम केलंय. हिप हिप हुरै, कहता है दिल, ससुराल सिमर का, अनुपमा अशा अनेक मालिकांत त्याने काम केलंय.

लग्नाबद्दल अधिक माहिती देताना रुशाद म्हणाला की, आम्ही गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करतो आहोत. आता लग्नाचा विचार केला आहे. 2013 मध्ये मी माझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर मी केतकीच्या प्रेमात पडलो. तिच्यासोबत विचार जुळल्यानं मी तिच्या सोबत लग्नाचा विचार केला. ती कमालीची साधी व शांत मुलगी आहे. आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने आम्ही एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजू शकलो.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन