Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही दोघं..'; ओंकार भोजने अन् तुझं नातं काय? अंकिता वालावलकरने अखेर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:38 IST

Ankita walawalkar: अंकिताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ओंकार भोजनेसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं.

 महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा ओंकार भोजने गेल्या काही दिवसांपासून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्यामुळे चर्चेत येत आहे. एका कार्यक्रमात त्याने तो अंकिताचा चाहता असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. परंतु, अलिकडेच या नात्यावर अंकिताने भाष्य केलं आहे.अंकिताने नुकतीच 'दॅट ऑड इंजिनिअर' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला ओंकारविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर उत्तर देताना तिने ओंकारसोबत मैत्रीचं नातं असल्याचं म्हटलं.

"ओंकार भोजने आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. मला काही दिवसांपूर्वी एक कलाकार भेटले होते. त्यांनी मला ओंकार आणि माझ्या लग्नाविषयी विचारलं. त्यावर असं काहीही झालेलं नाही असं मी सांगितलं. ओंकार हा मित्र म्हणून खरंच खूप चांगला आहे", असं अंकिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी सिनेसृष्टीतील नाही. माझा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. पण, जेव्हा मला एकटं वाटतं किंवा एखादी गोष्ट मला कळत नाही त्यावेळी जर मी कोणाला मेसेज करु शकते तो व्यक्ती म्हणजे ओंकार भोजने. त्याला मी एखादा विषयाबद्दल सहज विचारु शकते. माझं कुठेही काहीही अडलं आणि जर मी त्याला सांगितलं, तर तो असा व्यक्ती आहे की एकतर तो स्वत: उभा राहिल किंवा तो इतर मित्रांना तिथे उभा करु शकेल. तसा तो माझा सिनेसृष्टीतील एक मित्र आहे."

दरम्यान,  ओंकार भोजने सध्या करुन गेलो गाव या नाटकात काम करताना दिसत आहे. तसंच अलिकडेच तो सरला एक कोटी या सिनेमात झळकला होता. त्यानंतर तो कलावती या आगामी सिनेमात झळकणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनमहाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटी