Join us
Daily Top 2Weekly Top 5

DP चा खेळ रंपाट तर अंकिता झाली 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल'! बिग बॉस मराठीमध्ये ग्रँड सेलिब्रेशन, बघा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:44 IST

DP आणि अंकिताच्या खेळाचं ग्रँड सेलिब्रेशन झालंय. यावेळी अंकिता वालावलकर आणि DP च्या खेळाचं बिग बॉसने कौतुक केलं (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. रविवारी ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रंगणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या ग्रँड फिनालेमध्ये सध्या सात जण शर्यतीत आहे. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत हे सात जण फिनालेच्या शर्यतीत आहेत. यापैकी आज DP आणि अंकिताच्या बिग बॉस प्रवासाचं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे.

अंकिता आणि DP चं ग्रँड सेलिब्रेशन

काल बिग बॉसमध्ये काही सदस्यांच्या प्रवासाचं ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. आज उर्वरीत सदस्यांचं सेलिब्रेशन होणार आहे. यामध्ये DP आणि अंकिता वालावलकर यांचा प्रवास बिग बॉस दाखवण्यात येणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर... ही आहे महाराष्ट्र हार्टेड गर्ल..". तर डीपीबद्दल बोलताना बिग बॉस म्हणत आहेत,"या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं..या डीपीचा खेळ रंपाट होता...हा डीपीच झिंग झिंग झिंगाट होता".'बिग बॉस' स्वत: सध्या घरातील प्रत्येक सदस्याचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहेत. 

निक्की तांबोळी पोहोचली फिनालेमध्ये

 बिग बॉसने काही दिवसांपुर्वी घोषणापत्र घरात पाठवलं. ते अंकिताने वाचलं. त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये ज्याचे पॉईंट्स जास्त असतील तो सदस्य तिकीट टू फिनालेचा उमेदवार होणार होता. अखेर ३०० कॉईन्स असल्याने निक्कीला थेट उमेदवारी मिळाली. पुढे टास्क जिंकून सूरजलाही तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळाली. शेवटी सूरज आणि निक्कीमध्ये टास्क झाला. या टास्कमध्ये बाजी मारुन निक्कीने तिकीट टू फिनाले जिंकत बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये मजल मारली आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन