Join us

धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 14:09 IST

'धकधक गर्ल' अंकिता लोखंडे!

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) म्हणजे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा. 'पवित्र रिश्ता' ते 'बिग बॉस' अशा तिचा प्रवास आहे. अंकिताने यादरम्यान डान्स रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला. ती उत्तम डान्सर आहे हे तिने अनेकदा सिद्ध केलंय. तिने नुकताच  'धकधक करने लगा' या आयकॉनिक गाण्यातील माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) लूक केला. तिची तुलना माधुरीसोबत होऊ लागली. पण तिला अशा गेटअपमध्ये पाहून काही नेटकऱ्यांनी मात्र 'माधुरी बनायला जाऊ नको' अशा कमेंट्स केल्या आहेत.  

'धकधक गर्ल' म्हणून माधुरीला ओळखले जाते. 1992 साली आलेल्या 'बेटा' सिनेमातलं हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. यात माधुरीचा लूक पाहून प्रेक्षक घायाळ झाले होते. पिवळा ब्लाऊज आणि हिरवी नऊवारी, नाकात नथ, गळ्यात दागिने, हातात बांगड्या अशा हुबेहूब लूक करत अंकिता लोखंडे काल कॅमेऱ्यात कैद झाली. अंकिताकडे पाहूनही चाहते प्रभावित झाले. अंकिताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका रिएलिटी शोसाठी तिने हा लूक केला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मात्र काही नेटकऱ्यांना अंकिताची तुलना माधुरीशी केलेली अजिबात पटलेली नाही. माधुरीच बेस्ट अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. दोघींचा लूक जरी सारखा असला तरी युझर्सला अंकितापेक्षा आजही माधुरीवरच फिदा आहेत. 'स्वत:ला माधुरी समजू नकोस' असं म्हणत तिला ट्रोलही करण्यात आलंय.

बिग बॉसनंतर अंकिताचा भाव आणखी वाढला आहे. रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात तिने सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली. तिच्या कामाचं कौतुक झालं. अंकिता आगामी काही हिंदी सिनेमांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेमाधुरी दिक्षितसोशल मीडियाबॉलिवूड