Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कच्चा बदाम' गर्लनं भाजप नेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपूडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 15:35 IST

अंजली अरोरा ही सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' या गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आली होती. तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान ...

अंजली अरोरा ही सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' या गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आली होती. तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या अंजली तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावरुन तिनं साखरपुडा केल्याचा अंदाज चाहेत बांधत होते. यावर आता अंजनलीनं व्हिडीओ पोस्ट करत सत्य परिस्थिती सांगितली आहे.  

अंजलीनं तिचा बॉयफ्रेंड आकाशसोबतचा एक व्हिडीओ 1 एप्रिल रोजी शेअर केला होता. ज्यामध्ये हाता अंगठी घातल्याचं दिसून येत होतं. शिवाय 'लवकरच लग्न करणार' असं कॅप्शन तिनं दिलं होतं. यावरुन तिचा साखरपुडा झाल्याचं बोललं जात होतं. 

आता अंजलीनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, 'तुम्हाला माझा जोक कसा वाटला? एप्रिल फूलच्या शुभेच्छा मित्रांनो. मला सर्वांकडून अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे मी खरं सांगावं असं वाटलं. मी लग्न केलं नाही हे सत्य आहे. मी अजून लग्न करणार नाही कारण मी अजून लहान आहे. निवांत रहा'. तर अंजलीनं लग्न केलं नसून तिनं चाहत्यांना एप्रिल फूल केलं आहे.

अंजली अरोरा आकाश सनसनवाल याला डेट करत आहे.  आकाश सनसनवाल हा भाजपचा सदस्य आहे. ओबीसी मोर्चाच्या महरौली जिल्ह्याचा आकाश उपाध्यक्ष आहे.  शिवाय आकाश सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील आहे.  आकाशची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. अंजली-आकाश एकमेकांसोबतचे फोटो- व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

 

टॅग्स :टेलिव्हिजनसोशल मीडियासोशल व्हायरलसेलिब्रिटी