Join us

बॉलिवूड सिनेमात दिसणार 'अंगूरी भाभी', मराठमोळ्या शुभांगीला मिळाला लीड रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:22 IST

'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातूनच मराठमोळी शुभांगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

'भाभीजी घर पर है' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका प्रचंड गाजली. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या लोकप्रिय मालिकेवर सिनेमा येणार आहे. या सिनेमात 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातूनच मराठमोळी शुभांगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

बॉलिवूड पदार्पणावर शुभांगी म्हणाली, "मी एक अभिनेत्री आणि कलाकार आहे. त्यामुळे कोणत्या माध्यमात काम करते, यामुळे फरक पडत नाही. मग ते टीव्ही, सिनेमा किंवा ओटीटी असो. मी पूर्णपणे माझं १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते. 'भाभीजी घर पर है' मालिकेवरच सिनेमा बनत असल्याने बहुतांश काम हे तसंच असणार आहे. पण, तरीदेखील थोडी भीती आणि उत्सुकता आहे". 

"मी गेल्या कित्येक वर्षांपासून अंगूरी भाभीची भूमिका साकारत आहे. पण, सिनेमासाठी वेगळ्या पद्धतीने काम केलं जातं. मी नेहमीप्रमाणे यावेळीही पूर्ण प्रयत्न करत आहे. माझ्या चाहत्यांकडून खूप सारं प्रेम, आशीर्वाद यांची अपेक्षा करते. या सिनेमात तुम्हाला काही नवीन कलाकारही दिसणार आहे. टीव्हीवर काम करताना सुधारणेला वाव असतो. पण,  सिनेमा दोन ते अडीच तासांचा असल्याने सिनेमात तुम्हाला काळजीपूर्वक काम करावं लागतं", असंही शुभांगीने सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसिनेमा