Join us

'आणि चांद तुझ्या डोळ्यांत..' हृताचा क्लासिक लूक पाहून चाहते झाले सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:10 IST

Hruta durgule: हृताचा नवा लूक सध्या चर्चेत येत आहे.

अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. 'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. गेल्या काही काळापासून हृता कोणत्याही मालिका वा सिनेमात झळकली नाही. त्यामुळे तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. परंतु, हृता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

हृताचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते. इतकंच नाही तर ती पडद्यावर जरी सध्या दिसत नसली तरी अनेक नामांकित ब्रँडसोबत कोलॅब्रेशन करत आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती चाहत्यांना भेटत असते.

अलिकडेच हृताने एका ब्रँडसोबत  कोलॅब्रेशन केलं असून एक छानसा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृता कमालीची सुंदर दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून त्यावर हलकासा मेकअप केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिचा लूक पाहून चाहते कमालीचे खूश झाले आहेत.

दरम्यान, हृताने काही महिन्यांपूर्वीच प्रतिक शहा याच्यासोबत लग्न केलं. या जोडीला लग्नसोहळा मराठी कलाविश्वात विशेष गाजला होता. हृताप्रमाणेच प्रतिक सुद्धा कलाविश्वात सक्रीय आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा