सोशल मीडियाच्या या जगात एका व्यक्तीची चांगलीच चर्चा आहे, ती व्यक्ती म्हणजे अनाया बांगर. भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर अनायाचे वडील. अनाया बांगरने लिंगपरिवर्तन केल्याने ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अनायासोबत लग्न करण्यासाठी अनेक तरुणांकडून तिला मागण्या येत आहे. अनाया सध्या अश्नीर ग्रोव्हरच्या रिअॅलिटी शो राईज अँड फॉलमध्ये सहभागी आहे. यावेळी बोलताना अनायाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलं किती उत्सुक आहेत, याचा खुलासा केला.
अनयाचा लग्नाबद्दल मोठा खुलासा
'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोदरम्यान अनायाने खुलासा केला की, ''सोशल मीडियावर अनेक तरुण माझ्यासोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत. मला रोज हजारो मेसेज येतात. मी सर्वांना उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटू शकते. माझ्याकडे आतापर्यंत ३० ते ४० हजार स्थळं आली आहेत. मी लग्न करण्यास खूप उत्सुक आहे, पण सध्या माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी सर्वांशी संवाद साधू शकेन.''
अनाया बांगर ही सोशल मीडियावर तिच्या हटके व्हिडिओंमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. लोक तिच्या व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करतात. तिच्या एका व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, लोक तिला लग्नासाठी प्रपोज करत आहेत आणि तिला इतके स्थळे आली आहेत की तिला त्या सगळ्यांना उत्तर देणे शक्य होत नाही. तिने हेही स्पष्ट केले की, ती सध्या फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. पण भविष्यात जेव्हा ती लग्न करण्याचा विचार करेल, तेव्हा ती नक्कीच या प्रस्तावांचा विचार करेल. अशाप्रकारे अनायाने लग्नाबद्दल खास खुलासा केला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.