Join us

 अमिताभ बच्चन यांना आठवलं ब्रेकअपचं दु:ख, भावूक होत म्हणाले तरुणपणी मीसुद्धा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:19 IST

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणपणातील आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळात झालेल्या ब्रेकअपचं दु:ख आठवून अमिताभ बच्चन हे भावूक झाले.

बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा १४वा हंगाम सध्या सुरू आहे. या हंगामालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक भागात अमिताभ बच्चन हे स्पर्धकांशी आपलेपणाने जोडून घेत असतात. तसेच स्वत:च्या जीवनाशी संबंधित काही अनुभव, गोष्टीही सांगत असतात. दरम्यान, कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणपणातील आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळात झालेल्या ब्रेकअपचं दु:ख आठवून अमिताभ बच्चन हे भावूक झाले.

अमिताभ बच्चन यांच्यासमोर या भागात आलेले स्पर्धक तरुण होते. बोलता बोलता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडकडे इशारा करत विचारले की, त्यांची कुणी खास मैत्रिण आहे की नाही. त्यावर त्या तरुणाने सांगितले की, माझी गर्लफ्रेंड होती, मात्र काही काळापूर्वीच माझं ब्रेकअप झालं आहे. त्यावर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की मीही ब्रेकअपचं दु:ख झेललं आहे. त्यामुळे तुझ दु:ख मी समजू शकतो.

या तरुणाने जेव्हा अमिताभ बच्चन यांना ब्रेकअपबाबत सांगितलं, तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले की, त्या तरुणाला पुढे आणखी काही सांगण्याची गरज नाही. कारण मी ब्रेकअपचं दु:ख किती वाईट असतं हे समजतो. आता आमचं लग्न झालंय.  मात्र तरुणपणामध्ये मी ब्रेकअपचं दु:ख सहन केलं आहे. त्याच्या वेदना किती असतात, हे मला माहिती आहे. अमिताभ बच्चन यांचे हे बोल ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी जागवलेली ही आठवण अनेकजण अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील तुटलेल्या नात्याशी संबंधित असल्याचा तर्क लावत आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीबॉलिवूडरिलेशनशिप