Join us

अभिनेता गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये परतणार का ? खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:13 IST

सध्याच्या घडीला गौरव मोरे ( gaurav more) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.  छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो ...

सध्याच्या घडीला गौरव मोरे ( gaurav more) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.  छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहचला. फिल्टर पाड्याचा बच्चन या नावाने विशेष लोकप्रिय असलेल्या गौरवने छोट्या पडद्यासह रुपेरी पडदाही गाजवला आहे. नुकतंच त्याचा 'अल्याड पल्याड' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतंच या चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली. या पार्टीत 'लोकमत फिल्मी'शी बोलताना गौरवने प्रेक्षकांना मोठं अपडेट दिलं आहे. 

गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता  'अल्याड पल्याड २' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमासोबत इतरही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं गौरव मोरेनं सांगितलं. तो म्हणाला, 'काही प्रोजक्ट लाईनअपमध्ये आहेत. झालं की नक्की सांगेन. सध्या सांगता येणार नाहीत. सिनेमा आणि इतर माध्यमांमध्ये मी दिसेल. मी आधीही बोललो आहे की, मी सगळ्या माध्यमात काम करण्यासाठी तयार आहे. मला फक्त काम करायचं आहे'. 

गौरव मोरे काही दिवसांपुर्वी सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचायेंगे'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'मॅडनेस मचायेंगे' हा शो संपला आहे.  'मॅडनेस मचायेंगे'मध्ये एन्ट्री घेण्याआधी गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो सोडला होता. आता पुन्हा गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परतणार की कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात एन्ट्री घेणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. गौरव मोरे कुठल्या कार्यक्रमात झळकणार हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन