Join us

अली गोनी ४ वर्षांनी घर सोडताना झाला भावुक, जास्मीन भसीसोबत लिव्ह इनमध्ये राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:01 IST

मुस्लिम असल्याने घर मिळत नसल्याचं... अली गोनी काय म्हणाला?

'ये है मोहोब्बते' फेम अभिनेता अली गोनी (Aly Goni) सध्या चर्चेत आहे. बिग बॉस १४ पासून तो जास्मीन भसीनला डेट करतोय. आता दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहेत. त्यासाठी अली ज्या घरात ४ वर्षांपासून राहत होता ते घर आता सोडत आहे. घर सोडताना अली भावुक झाला असून त्याने व्हिडिओ शेअर करत भावना मांडल्या आहेत.

युट्यूब व्लॉगमध्ये अली गोनी म्हणाला, "मी आणि जास्मीन एकत्र राहणार आहोत म्हणून मी खूप आनंदी आहे. पण मला दु:खही होतंय कारण आपलं घर सोडणं इतकं सोपं नाही. ४ वर्ष ज्या घरातून मी राहिलो ते मी आता सोडत आहे. हे खरंच खूप कठीण आहे. या घरता इतक्या आठवणी आहेत, चांगला आणि वाईट दोन्ही काळ याच घरात पाहिला. आता मी पॅकिंग करत आहे पण मला हे घर सोडताना खरंच खूप वाईट वाटतंय."

काही दिवसांपूर्वीच अलीने मुंबईत घर मिळण्यात अडचणी येत असल्याचंही सांगितलं होतं. 'मुस्लिमांना आम्ही घर देत नाही' अशी उत्तरं त्याला अनेक ठिकाणी मिळाली होती. अली आणि जास्मीनने मुंबईत अनेक ठिकाणी घर शोधलं मात्र त्यांना या कारणामुळे लवकर मिळालं नाही.

पाच वर्षांपासून जास्मीन आणि अली रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र यावर स्पष्टीकरण देत सध्या लग्नाचा विचार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आता दोघंही लिव्ह इन मध्ये राहणार आहेत. 

टॅग्स :जास्मीन भसीनटिव्ही कलाकार