Join us

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding :आता हा ट्रेंड कधी आला ! पाठकबाईंनी चक्क नखांवर लिहिली लग्नाची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:37 IST

लग्न म्हणजे आयुष्यातील कायम लक्षात राहणारा आणि खास दिवस. अक्षया देवधरने हाच दिवस आपल्या नखांवर कोरलाय. बघा कसं.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : लग्न म्हणजे आयुष्यातील खुप सुरेख दिवस. यानंतर आयुष्य पुर्णपणे बदलून जातं. हा दिवस कायम लक्षात राहणारा आणि खास असतो. अनेक जण लग्नाच्या तारखेचा टॅटू देखील काढतात. तर हे सगळं सांगायचे कारण हे की लोकप्रिय टीव्ही कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीचे, हळद, मेहंदीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता नवीनच चर्चा आहे ती अक्षयाच्या नेल आर्ट ची. 

अक्षया देवधर ने तिच्या नेल आर्ट चा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हे कुठले साधेसुधे आर्ट नाही तर तिने नखांवर लग्नाची तारीख सुद्धा लिहिली आहे. यावरुन आता अक्षया लग्नाची तारीखही स्पष्ट झाली आहे. २ डिसेंबर ला हे दोघेही लग्नबंधनात अडकत आहेत. हीच तारीख तिने नखांवर लिहिली आहे. आता हा ट्रेंड कधी आला असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय. 

अक्षया आणि हार्दीक यांनी अधिकृतपणे लग्नाची तारीख जाहीर केलीच नव्हती. तर त्यांच्या मित्रांच्या स्टोरीवरुन लग्न २ डिसेंबर ला आहे हे कळले होते. आता स्वत: अक्षयाने नखांवर लिहित लग्नाची तारीख जाहिर केली आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीलग्नकलासोशल मीडिया