Join us  

लेकाच्या डान्सपुढे अविनाश नारकर पडले फिके; ऐश्वर्या यांच्या मुलाचा जबरदस्त Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 9:03 AM

Amey narkar: अमेय, आई-वडिलांसारखाच उत्तम डान्सर असून त्याच्या डान्सची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विशेष म्हणजे आजदेखील ही जोडी कलाविश्वात आणि खासकरुन सोशल मीडियावर सक्रीय आहे. ऐश्वर्या आणि अविनाश या जोडीचे अनेक रिल्स नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लेकाची चर्चा रंगली आहे. त्यांचा लेक सुद्धा डान्सच्या बाबतीत आई-वडिलांच्या मागे नाही.

९०च्या दशकातील मराठमोळ एक लोकप्रिय कपल, जे सध्या कायम चर्चेत असतं ते म्हणजे नारकर कपल. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याचे प्रत्येक व्हिडीओ हे व्हायरल होतं असतात. अनेकदा या व्हिडीओंमुळे ते ट्रोलही होतात. पण त्या ट्रोलर्सना दोघंही सडेतोड उत्तर देतात. आता नारकर कपलच्या व्हिडीओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशातच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या लेक अमेय नारकरचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीला अमेय हा एकुलता एक लेक आहे. अमेयदेखील कलाविश्वास सक्रीय आहे. मात्र, सोशल मीडियावर त्याचा म्हणावा तितका वावर नाही.परंतु, सध्या सोशल मीडियावर त्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने जबरदस्त डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्याचा डान्स पाहून तो आई-वडिलांसारखाच उत्तम डान्सर असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमेयने त्याच्या मैत्रिणीसोबत ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची डान्स करतानाची एनर्जी अविनाश नारकर यांच्यासारखीच आहे.  सध्या त्याच्या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

अमेयने रुईया महाविद्यालयातून त्याचं शिक्षण पूर्ण केलं असून कॉलेजमध्ये असतानाच नाटक, एकांकिकांमध्ये तो काम करायचा. अलिकडेच त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयने सांभाळली.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार