Join us

ऐश्वर्या-अविनाश यांचं ट्विनिंग, 'पुष्पा'च्या गाण्यावर रील बनवत नारकर कपलने केलं न्यू इयर सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:22 IST

नारकर कपलचं ट्रेण्डिंग गाण्यावर रील, ट्विनिंग करत ऐश्वर्या-अविनाश यांनी केलं नववर्षाचं स्वागत

२०२४ हे वर्ष संपून आता नववर्षाला सुरुवात झाली आहे. थर्टी फर्स्ट साजरी करत सगळ्यांनी २०२५चं जोरदार वेलकम केलं. सेलिब्रिटींनीही नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी खास पद्धतीने २०२४ ला निरोप देत २०२५ वर्षाचं दिमाखात वेलकम केलं आहे. 

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनी त्यांच्या रील स्टाइलने खास अंदाजात नववर्षाचं स्वागत केलं. त्या दोघांनी पुष्पामधील फिलिंग या गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. याचा व्हिडिओ ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतर रील्सप्रमाणे ऐश्वर्या-अविनाश यांच्या या रीलला देखील चाहत्यांची पसंती मिळत आहे. या रीलवर कमेंट करत चाहत्यांनी नारकर कपला नववर्षाभिनंदन केलं आहे.

 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. ऐश्वर्या-अविनाश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ट्रेंडिंग गाण्यावरील त्यांचे रील्स प्रचंड व्हायरलही होतात. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता