Join us

अविनाश नारकरांना 'बाबू' म्हणाल्या ऐश्वर्या; गोंधळून गेलेल्या अभिनेत्याने दिली भन्नाट रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:30 IST

Avinash narkar:या जोडीने एका ट्रेंडिंग गाण्यावर रील शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. उत्तम अभिनयामुळे लोकप्रिय असलेली ही जोडी गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा असते. ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ते अनेकदा मजेशीर रिल्सदेखील शेअर करतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अविनाश यांनी त्यांचा साथ दिली आहे. एका ट्रेंडिंग  डायलॉगवर त्यांनी हे रील शेअर केलं आहे. विशेष म्हणजे या रीलमध्ये ऐश्वर्या यांनी अविनाश नारकर यांचा बाबू असा उल्लेख केल्यानंतर त्यांनी मजेशीर रिॲक्शन दिली आहे.

'मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही', असं अविनाश नारकर म्हणतात. त्यावर,' बाबूssss' असं ऐश्वर्या नारकर म्हणतात आणि हळूच त्यांच्या गालावर चापट मारतात. ज्यामुळे अविनाश नारकर थक्क होतात. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेताऐश्वर्या नारकरअविनाश नारकर