Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ईना मीना डिका...", एकत्र आलं ऐश्वर्या-अविनाश नारकर अन् अश्विनीचं त्रिकुट, केला भन्नाट डान्स

By कोमल खांबे | Updated: March 19, 2025 13:54 IST

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी नवा रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना अभिनेत्री अश्विनी कासारनेही उत्तम साथ दिल्याचं दिसत आहे. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ते दोघेही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्यांचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात. आतादेखील ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी नवा रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना अभिनेत्री अश्विनी कासारनेही उत्तम साथ दिल्याचं दिसत आहे. 

ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर आणि अश्विनी कासार यांनी ईना मीना डिका या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अविनाश आणि ऐश्वर्या यांना अश्विनीने डान्समध्ये कमालीची साथ दिली आहे. या त्रिकुटाचा हा रील व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. ऐश्वर्या, अविनाश आणि अश्विनी त्यांची १० वर्षांची मैत्री सेलिब्रेट करत आहेत. यानिमित्त या त्रिकुटाने हा खास डान्स व्हिडिओ बनवला आहे. 

अश्विनी कासार, ऐश्वर्या-अविनाश नारकर या तिघांनी सोयरे सकळ या नाटकात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच त्या तिघांनी रील्स बनवायला सुरुवात केली होती. ऐश्वर्या-अविनाश यांना रील्समुळे ट्रोलही केलं जातं. पण, ते कायमच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरटिव्ही कलाकार