Join us

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं आणि...' नंतर 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अवघ्या ९ महिन्यांतच गाशा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:17 IST

अवघ्या ९ महिन्यांतच गाशा गुंडाळला; 'थोडं तुझं आणि...' नंतर 'ही' लोकप्रिय मालिका होणार ऑफ एअर

Tv Serial: सध्या छोट्या पडद्यावर  नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. वाहिन्यांकडून नव्या मालिकांची घोषणा करण्यात येत आहे. या छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. मात्र, सध्या या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. ज्या मालिकांचा टीआरपी उत्तम असतो अशा मालिका वर्षानुवर्ष सुरु असतात. तर याउलट ज्या मालिकांना फारसा चांगला टीआपी मिळत नाही अशा मालिकांना लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो.  

अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती समोर आली. या मालिकेचा शेवटचा भाग १२ सप्टेंबरला प्रसारित होणार आहे. शिवानी सुर्वेने याबाबत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मालिका संपणार असल्याचं स्पष्ट केलं. या बातमीने चाहते नाराज झाले आहेत. असं असतानाच आता स्टार प्रवाहची आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.  निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ही मालिका अवघ्या वर्षभरातच ऑफ एअर होणार असल्याची माहिती मिळते आहे.  

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेचा पहिला भाग २ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर आता ९ महिन्यांच्या कालावधीतच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १२ सप्टेंबरला या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित व्हायची आता त्याजागी शुभविवाह मालिका दाखवण्यात येणार आहे. तर दुपारी २ वाजता रुपाली भोसलेची 'लपंडाव' ही मालिका प्रेक्षिपित केली जाणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजननिवेदिता सराफसेलिब्रिटीसोशल मीडिया