Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेमी लीव्हरला पाहुन अदनाना सामीने दिली 'ही' दाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:15 IST

अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे

ठळक मुद्देजेमीला साथ मिळाली ते विनोदी सूत्रधार संकेत भोसलेचीदोघांनी कार्यक्रमात धमाल-मस्ती केली

अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रमातील वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी यात जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर येणार आहे. जेमीला साथ मिळाली ते विनोदी सूत्रधार संकेत भोसलेचीही साथसंगत लाभली आणि या दोघांनी कार्यक्रमात धमाल-मस्ती केली. 

आपली मार्मिक शेरेबाजी आणि विनोदी नकलांमुळे जेमी लीव्हरने ‘द व्हॉइस’मधील मनोरंजनाचा स्तर नक्कीच उंचावला होता. अभिनेत्री कंगना राणावतच्या तिने केलेल्या नकलेने प्रेक्षकांची हसून हसून लोटपोट झाली. तिने वडील जॉनी लीव्हर यांची देखील नकल केली आणि हे पाहुन सर्वजण थक्क झाले. तिच्या या नकला पाहुन प्रभावित झालेला प्रशिक्षक अदनान सामी म्हणाला, “मी स्वत: जॉनी लीव्हरजी यांचा प्रचंड मोठा फॅन असून मी त्यांच्या कलेची कदर करतो. पण आज मी जेमी लीव्हरच्या विनोदी अदांज पाहुन भारावून गेलो आहे. ती अप्रतिम कलाकार असून विलक्षण गुणी आहे.”स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात जेमी लीव्हरला आपल्या विनोदी गुणांनी प्रेक्षकांवर प्रभाव टाकताना पाहणे  निश्चितच उत्सुकतापूर्ण ठरेल. या कार्यक्रमातील पहिली बाद फेरी जवळ येऊन ठेपल्याने कार्यक्रम चुरशीचा बनला आहे. 

टॅग्स :स्टार प्लसद व्हॉइस शोजॉनी लिव्हर